माझे आवडते पेय चहा

माझे आवडते पेय चहा

मी रोज चहा पितो.

चहा प्यायल्या शिवाय माझा दिवस सुरू होत नाही.

चहा प्यायल्या वर फ्रेश वाटत.

फ्रेश वाटल की झोप भुर्रSSSSS जाते.

मी पण सुट्टीत भुर्रS जाणारे ट्रिपला.

ट्रिपला गेलो तरी चहा लागतो.

माझा भाऊ कॉफी पितो.

तो म्हणतो कॉफी जास्त रिफ्रेशीग असते. मग आम्ही भान्डतो.

सिरीयल मधल्या बायका पण सारख्या भान्डत असतात.

पण त्या चहा पित नाही भान्डत. मी चहा पित भान्डतो.

चहा काळा असतो पण दूध घातलं की लाईट ब्राऊन होतो.

माझा कुत्रा काळा आहे पण त्याने दूध प्यायले तरी तो काळाचं राहतो याला म्हणतात जादु.

जादु नावाचा एक एलियन ह्रितीक बरोबर राहायचा. तो ऊन प्यायचा आणि ह्रितीक बोर्नव्हिटा प्यायचा.

पण मी चहाचं पितो.

मला चहा खूप आवडतो.

आता तुम्हीही चहा प्या आणि मला पण पियु द्या…….